अरबी भाषा


Contributors to Wikimedia projects

Article Images

अरबी भाषा (अरबी: العربية, उच्चारः अल् अरबीयाह्) ही जगातील एक प्रमुख भाषा आहे. अरब लोकांवरुन ह्या भाषेचे नाव अरबी असे पडले.अरबी भाषेस पवित्र भाषा असे मानण्यात आले आहे, इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराण हा ह्याच भाषेत आहे, तसेच इस्लाम धर्माचे संस्थापक,प्रेषित मुहम्मद पैगंबर ह्यांची बोलीभाषा अरबी होती.

अरबी
العربية
स्थानिक वापर अरब संघामधील सर्व देश (इस्लाम धर्माची पवित्र भाषा)
प्रदेश मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका, आफ्रिकेचे शिंग
लोकसंख्या २९ कोटी (२०१०)
क्रम
भाषाकुळ
लिपी अरबी वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर

२७ इस्लामिक देशांची राष्ट्रभाषा[]

भाषा संकेत
ISO ६३९-१ ar
ISO ६३९-२ ara
ISO ६३९-३ ara (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
भाषिक प्रदेशांचा नकाशा

अरबी ही एकमेव अधिकृत भाषा (हिरवा रंग) व अरबी ही एक अधिकृत भाषा (निळा रंग)

अरबी (लिपी) भाषेतील लिखाणशैलीचे एक उदाहरण.

सध्या जगातील एकूण २९ कोटी लोक अरबी भाषा वापरतात.

जगातील एकूण २५ सार्वभौम देश व २ अमान्य देशांमध्ये अरबी ही राजकीय भाषा आहे. ह्याबाबतीत इंग्लिशफ्रेंच खालोखाल अरबीचा तिसरा क्रमांक आहे.

देश लोकसंख्या टीपा
  अल्जीरिया 34,895,000
  बहरैन 807,000
  चाड 10,329,208 फ्रेंच सोबत सह-राजकीय भाषा
  कोमोरोस 691,000 फ्रेंचकोमोरियन सोबत सह-राजकीय भाषा
  जिबूती 864,000 फ्रेंच सोबत सह-राजकीय भाषा
  इजिप्त 79,089,650
  इरिट्रिया 5,224,000 इंग्लिशतिग्रिन्या सोबत सह-राजकीय भाषा
  इराक 31,234,000 कुर्दी सोबत सह-राजकीय भाषा
  पॅलेस्टाईन 4,293,313 वेस्ट बँक, गाझा पट्टीपूर्व जेरुसलेम हे पॅलेस्टिनी राज्याचे भूभाग असल्याचा दावा आहे.
  इस्रायल 7,653,600 हिब्रू सोबत सह-राजकीय भाषा
  जॉर्डन 6,407,085
  कुवेत 3,566,437
  लेबेनॉन 4,224,000
  लीबिया 6,420,000
  मॉरिटानिया 3,291,000
  मोरोक्को 32,200,000 बर्बर सोबत सह-राजकीय भाषा
  ओमान 2,845,000
  कतार 1,696,563
  सौदी अरेबिया 25,731,776
  सोमालिया 9,359,000 सोमाली सोबत सह-राजकीय भाषा
  सुदान 43,939,598 इंग्लिश सोबत सह-राजकीय भाषा
  सीरिया 22,505,000
  ट्युनिसिया 10,432,500
  संयुक्त अरब अमिराती 4,975,593
  यमनचे प्रजासत्ताक 23,580,000
देश टीपा
  सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक पश्चिम सहारावर हक्काचा दावा; स्पॅनिश सोबत सह-राजकीय भाषा
  सोमालीलँड उत्तर सोमालियावर हक्काचा दावा; सोमाली सोबत सह-राजकीय भाषा
  1. ^ Wright, 2001, p. 492.