इस्तंबूल


Contributors to Wikimedia projects

Article Images

इस्तंबूल (तुर्की: İstanbul) हे तुर्कस्तानातील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर तुर्कस्तानाचे आर्थिक तसेच सांस्कृतिक केंद्र आहे. मार्माराचा समुद्रकाळा समुद्र ह्यांना जोडणाऱ्या बॉस्फरसाच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही तीरांवर वसलेले हे शहर आशिया तसेच युरोप या दोन्ही खंडात आहे. जगातील मोठ्या शहरांपैकी हे एकमेव शहरे असे दोन खंडांत आहे.

इस्तंबूल 

city in Turkey located at the Bosporus Strait

माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारmetropolitan municipality in Turkey (इ.स. १९८४ – ),
former capital,
महानगर (इ.स. २००७ – ),
largest city (तुर्कस्तान, इ.स. १९२३ – ),
port settlement (7 century BC – ),
big city (4 century – ),
ancient city
स्थान इस्तंबूल प्रांत, तुर्कस्तान
पाणीसाठ्याजवळबोस्फोरस,
मार्माराचा समुद्र,
काळा समुद्र,
Golden Horn
सरकारचे प्रमुख
  • Ekrem İmamoğlu (इ.स. २०१९ – )
स्थापना
  • मे २९, इ.स. १४५३
महत्वाची घटना
  • Occupation of Constantinople (इ.स. १९१८ – इ.स. १९२३)
सर्वोच्च बिंदू
  • Aydos Hill
लोकसंख्या
  • १,५४,६२,४५२ (इ.स. २०२०)
क्षेत्र
  • ५,३४३ km²
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • १०० m
मागील.
  • Constantinople
मागील
  • Constantinople (fall of Constantinople, इ.स. १४५३)
अधिकृत संकेतस्थळ
Map४१° ००′ ३६″ N, २८° ५७′ ३७″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

या शहराला प्राचीन काळात बायझेंटियम तसेच कॉन्स्टॅंटिनोपल या नावांनीही ओळखण्यात येत असे. इ.स. ३३० पासून इ.स. १९२२ पर्यंत सुमारे १,६०० वर्षांच्या कालखंडात हे शहर कोणत्या न कोणत्या साम्राज्याची राजधानी होते. इ.स. ३३० - इ.स. ३९५ दरम्यान इस्तंबूल रोमन साम्राज्याची, इ.स. ३९५ - इ.स. १२०४इ.स. १२६१ - इ.स. १४५३ दरम्यान बायझेंटाईन साम्राज्याची, इ.स. १२०४ - इ.स. १२६१ दरम्यान लॅटिन साम्राज्याची तर इ.स. १४५३ - इ.स. १९५३ दरम्यान ओस्मानी साम्राज्याची राजधानी होते.

सध्या इस्तंबूल जगातील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. २०१२ साली येथे सुमारे १.१६ कोटी विदेशी पर्यटकांनी भेट दिली. २०१० मध्ये इस्तंबूल युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते. येथील ऐतिहासिक वास्तूंसाठी १९८५ साली इस्तंबूलचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला.

इस्तंबूल अतातुर्क विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून तुर्की एरलाइन्स ह्या तुर्कस्तानच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय व प्रमुख वाहतूकतळ इस्तंबूलमध्ये आहे.

फुटबॉल हा इस्तंबूलमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. गालातसराय एस.के., बेसिक्टास जे.के. आणि फेनर्बाचे एस.के. हे तीन प्रमुख फुटबॉल क्लब येथेच स्थित आहेत. येथील इस्तंबूल पार्कमध्ये २००५ ते २०११ दरम्यान तुर्की ग्रांप्री ही फॉर्म्युला वन शर्यत भरवली गेली.

इस्तंबूलवरील मराठी पुस्तके

संपादन

  • इस्तंबूल इस्तंबूल (अनुवादित कादंबरी; मूळ तुर्की लेखक - बुऱ्हान सोनमेझ; मराठी अनुवादक - सविता दामले)
  • इस्तंबुल टु अथेन्स (प्रवासवर्णन, लेखक -अच्युत बन)
  • इस्तंबूल ते कैरो (लेखकाच्या मते इस्लामची दोन रूपे, आठवणी, लेखक - निळू दामले)