कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ


Contributors to Wikimedia projects

Article Images

कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ

कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ (जपानी भाषा: 関西国際空港) (आहसंवि: KIXआप्रविको: RJBB) हा जपान देशाच्या ओसाका शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. ओसाका शहराच्या ३४ किमी नैऋत्येस ओसाकाच्या उपसमुद्रामधील एका कृत्रिम बेटावर बांधण्यात आलेला हा विमानतळ ओसाका शहर तसेच ओसाका प्रभागातील इतर अनेक शहरांसाठी प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवतो. १९९४ सालापासून कार्यरत असलेला कन्साई विमानतळ आजच्या घडीला तोक्यो शहरामधील हानेडा विमानतळनारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्यांच्याखालोखाल जपानमधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ
関西国際空港
कृत्रीम बेटावर बांधण्यात आलेला कन्साई विमानतळ
आहसंवि: KIXआप्रविको: RJBB

KIX is located in जपान

KIX

KIX

जपानमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा ओसाका
स्थळ ओसाका महानगर
हब ऑल निप्पॉन एरवेझ
फेडेक्स एक्सप्रेस
जपान एरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची १७ फू / ५ मी
गुणक (भौगोलिक) 34°26′3″N 135°13′58″E / 34.43417°N 135.23278°E
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
06R/24L ११,४८३ ३,५०० डांबरी
06L/24R १३,१२३ ४,००० डांबरी
सांख्यिकी (२०१७)
प्रवासी २,७९,८७,५६४
विमाने १,८५,१७४
कन्साई विमानतळाची इमारत
येथे उतरलेले एर चायनाचे एरबस ए३३० विमान