जत


Contributors to Wikimedia projects

Article Images

जत

जत हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे.

  ?जत

महाराष्ट्र • भारत

—  तालुका  —
Map

१७° ०३′ ००″ N, ७५° १३′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर विजयपुर, सांगली'ಪಂಢರಪೂರ'ಚಡಚಣ
भाषा मराठी, ಕನ್ನಡ
आमदार विक्रमसिंह दादा सावंत
माजी आमदार विलासराव जगताप(साहेब)
संसदीय मतदारसंघ सांगली
विधानसभा मतदारसंघ जत
तहसील जत
पंचायत समिती

अप्पर तहसीलदार कार्यालय = संख

जत
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१६४०४
• +०२३४४
• MH-10

जतचे सर्वांत पुरातन उल्लेख रामायणकाळातील असल्याचे मानले जाते - हा प्रदेश दंडकारण्यातले जयंतीनगर होते असे सांगितले जाते [ संदर्भ हवा ]. इ.स.च्या ११ व्या व १२ व्या शतकातील काही शिलालेख जत तालुक्यातल्या उमराणी, कोळेगिरी येथील पुरातन मंदिरांत आढळून येतात. कलचुरी घराण्यातील राजा बिज्जलदेव याने या मंदिरांना दाने दिल्याचे उल्लेख त्यांत आढळतात.

जत येथे डफळे संस्थांनाची राजधानी होती. तसेच जत पासून १८ किमी असणाऱ्या डफळापूर या गावी डफळे सरकारचा राजवाडा आहे.

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळ्याचा मोसम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

जत गावाच्या दक्षिणेला यल्लमा (रेणुका) देवीचे अर्वाचिन मंदिर् आहे. या देवीची यात्रा दक्षिण महाराष्ट्र तसेच उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध आहे. या यात्रेत जनावरांचा मोठा बाजार भरतो. जत हे नाव कन्नड मधील बैल एत्तु या प्रतिशब्दापासून उत्पत्ती पावले आहे असे मानले जाते.जत हा सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे.

जत तालुक्यातील गुड्डापूर हे गाव दानम्मा या देवतेचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. लिंगायत समाजाचे हे एक मोठे श्रद्धास्थान आहे.

बिळूर या गावचा भैरवनाथ प्रसिद्ध आहे. बनाळी या गावी बनशंकरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. जतच्या दक्षिणेला 3 कि.मी.वर डोंगरावर भवानीमातेचे मंदिर आहे.हा मंदिर परीसर अत्यंत रमणिय आहे. मुचंडी या गावात दरेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. गिरगांव हे गाव डोंगरांसाठी प्रसिद्ध आहे.

करेवाडी, कोंतेव बोबलादच्या शेंडगे वस्ती या ठिकाणी खंडोबा मंदिर आहे आणि ते जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. तिथे तीन वर्षातून एकदा दसऱ्याच्या वेळी मोठा कार्यक्रम घेतला जातो आणि या कार्यक्रमाला खूप वेगवेगळ्या गावातून भक्तगण गर्दी करतात. करेवाडी ( को) तांबेवस्ती येथे श्री मरगुबाई मंदिर आहे येथे लांबून यात्रेला भाविक दर्शनासाठी येतात.जतच्या पुर्वेला शेड्याळ या गावी महादेवाचे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. संख हे तालुक्यातील एक मोठे गाव आहे लोकांच्या सोईसाठी ईथे अप्पर तहसीलदार कार्यालय आहे.लायव्वादेवी मंदिर,गुरुबसवेश्वर मठ ईथे आहेत.