तेलंगणाचे मुख्यमंत्री


Contributors to Wikimedia projects

Article Images

तेलंगणाचे मुख्यमंत्री

भारताच्या तेलंगणा राज्याचे सरकार प्रमुख

तेलंगणाचा मुख्यमंत्री हा भारताच्या तेलंगणा राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. तेलंगणा विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

अनुमुला रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे दुसरे व विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

२०१४ साली आंध्र प्रदेश राज्यामधून तेलंगणा राज्य वेगळे करण्यात आले. २ जून २०१४ रोजी के. चंद्रशेखर राव हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले, तर ७ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अनुमुला रेवंत रेड्डी यांनी दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ते विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

क्र. नाव पदावरील काळ कार्यकाळ पक्ष
के. चंद्रशेखर राव २ जून २०१४ ७ डिसेंबर २०२३ ९ वर्षे, १८८ दिवस भारत राष्ट्र समिती
अनुमुला रेवंत रेड्डी ७ डिसेंबर २०२३ विद्यमान ० वर्षे, २९९ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस