देवदत्त दाभोळकर


Contributors to Wikimedia projects

Article Images

देवदत्त दाभोळकर

देवदत्त अच्युत दाभोळकर (जन्म : कोल्हापूर, २३ सप्टेंबर, इ.स. १९१९ - - सातारा, १७ डिसेंबर, इ.स. २०१०) हे शिक्षणतज्ज्ञ, समाजवादी विचारवंत, वाईच्या प्राज्ञपाठशाळा मंडळाचे सदस्य, पुणे विद्यापीठाचे दहावे कुलगुरू[] आणि संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक होते.

देवदत्त दाभोळकर हे दहा भावंडांमध्ये सर्वात वडील होते. इ.स. १९३६मध्ये ते मुंबई विद्यापीठातून मॅट्रिकच्या परीक्षेत पहिले आले होते. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातून ते एम.एससी. झाले आणि सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात आधी प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य झाले. इ.स. १९६० मध्ये त्यांनी सांगलीत चिंतामणराव पटवर्धन महाविद्यालय काढले आणि ते तेथे प्राचार्य झाले. दाभोळकर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे आणि मुंबईतील कीर्ती महाविद्यालयाचेही प्राचार्य राहिले आहत.

निवृत्तीनंतर इ.स.१९९०मध्ये ते साताऱ्याला जाऊन स्थायिक झाले होते..

  • ॲग्रो इंडस्ट्रियल बॅलन्स
  • ओ नर्मदा
  • क्लाइबिंग ए वॉल ऑफ ग्लास
  • पायलट सर्व्हे ऑफ शिरूर तालुका
  • सरदार सरोवर डिबेट
  1. ^ संजय वझरेकर (२३ सप्टेंबर २०१३). "नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत". लोकसत्ता. मुंबई. २५ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले.