धायरी


Contributors to Wikimedia projects

Article Images

धायरी

धायरी पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे.

या गावाबद्दल धायरी, सोन्याची पायरी असे म्हणतात. धायरी हा पुण्याच्या पश्चिमेकडील भाग आहे. धायरी गावाचे नाव धायरेश्वर महादेव मंदिरामुळे प्रसिद्ध झाले आहे. बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी बांधलेल्या डीएसके विश्व या वसाहतीमुळे धायरी गावाचे नाव पुण्यात अधिक परिचयाचे झाले

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते.येथे दगडाच्या खाणी असून निवासी संकुले बांधण्यासाठी लागणाऱ्या खडीसाठी खाणीतील दगड वापरतात.[]

  • उद्याने
  • टेकड्या

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

संपादन

मुळात शेतीप्रधान व्यवसाय असणारा धायरीचा भाग आता पूर्णतः शहरीकरण झालेला आहे. अजूनही लगड मळा तसेच डीएसके विश्व कडे जाणाऱ्या रस्त्यावर काही शेतकरी शेती करतात. धायरी गावापासून जवळच असणाऱ्या नऱ्हे गावात अनेक कारखाने आहेत. विशेषतः कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातून पुण्यात स्थायिक झालेले अनेक लोक धायरी विभागात वास्तव्य करून आहेत.

परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे

संपादन

शास्त्रीय गायक पंडित विजय कोपरकर धायरी येथे राहतात.

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, शनिवार दिनांक २२ जून २०२४