सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


Contributors to Wikimedia projects

Article Images

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

महाराष्ट्र राज्यातील एक विद्यापीठ

(पुम्बा या पानावरून पुनर्निर्देशित)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्यातील पुणे मधील एक विद्यापीठ आहे. मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली. या संस्थेचे मुख्य आवार ४११ एकर क्षेत्रांत पसरलेले आहे. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. भारताच्या काही प्रसिद्ध विद्यापीठातील हे एक विद्यापीठ आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
ब्रीदवाक्य यः क्रियावान् स पण्डितः
Type शासकीय शैक्षणिक आस्थापना
स्थापना १० फेब्रुवारी १९४९
विद्यार्थी १,७०,०००
संकेतस्थळ www.unipune.ac.in
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

महाराष्ट्र राज्यातील एक विद्यापीठ

Edificio principal de la universidad

माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविद्यापीठ
याचे नावाने नामकरण
स्थान पुणे, पुणे जिल्हा, पुणे विभाग, महाराष्ट्र, भारत
वारसा अभिधान
  • PMC Heritage Grade I
स्थापना
  • इ.स. १९४८
अधिकृत संकेतस्थळ
Map१८° ३३′ ०८.४२″ N, ७३° ४९′ २८.६४″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात

  • ४६ शैक्षणिक विभाग आहेत.
  • ४७४ महाविद्यालये आणि
  • सुमारे सहा लाख विद्यार्थी संख्या आहे.

पुणे विद्यापीठाची स्थापना पुणे विघापीठ अधिनियमच्या अधीन केली गेली, ज्याला १० फेब्रूवरी १९४८ला मुंबई विधान-मंडल ने पारित केले. त्याच वर्षी, डा एम॰ आर॰ जयकर यांनी विघापीठचे प्रथम उपकुलपतिचे पदभार ग्रहण केले. श्री बी॰ जी॰ खैर, जे मुंबई सरकार (विधान-मंडल)चे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री होते, त्यांच्या प्रत्यनातुन विघापीठला को मोठा भूखण्ड मिळवून देण्यासाठी मदत केली. प्रारंभिक १९५० मध्ये, विद्यापीठाला ४११ एकड़ (१.७ किमी²) भूमि आवंटित केली गेली.

पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. इ.स. १९६२ मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे स्थापन झालेल्या शिवाजी विद्यापीठच्या अखत्यारित गेले. इ.स. १९९० मध्ये धुळेजळगाव यांसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन झाले. आता फक्त पुणे, नगर, नाशिक हे तीनच जिल्हे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात.

इ.स. २००४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी पुणे विद्यापीठाचे आधीचे नाव बदलून 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' करावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या नावाशी, स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांचे नाव जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ७ जून २०१४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं.[]

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २० अध्यासने आहेत.

  • संत नामदेव अध्यासन केंद्र

विभाग आणि संशोधन केंद्रे

संपादन

 
शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एकूण ४६ विभाग आहेत, ज्यांमध्ये कला, विज्ञान, विधी, भाषां, मानव्यशास्त्रे, आणि अनेक आधुनिक ज्ञानशाखांच्या अध्यापनाचे आणि संदर्भातील संशोधनाचे काम केले जाते.

जयकर ग्रंथालय

  1. ^ "पुणे विद्यापीठाचा नामांतराचा प्रस्ताव मंजूर". आयबीएन लोकमत. ३० ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.