एकल सदस्य सनोंद प्रवेश पूर्ण झाल्याची उद्घोषणा - Meta


Article Images

Other languages:

या विकासाच्या प्रगतीच्या अद्ययावत बातमीसाठी, mw:SUL finalisation बघा.

विकिमिडिया फाऊंडेशनच्या विकसकांची चमू, खात्यांच्या काम करण्यावर बदल करीत आहे, आमच्या सध्या सुरू असलेल्या प्रयत्नात,सदस्यांना नविन व चांगली साधने उपलब्ध करून देणे(जसे दोन विकिंमधील अधिसूचना). या बदलास साहाय्यभूत होण्यास, सदस्याचे सदस्यनामसर्व ठिकाणी सारखे हवे. त्याने आम्ही आपणास नविन फिचर्स देऊ शकू जे आपणास संपादन व चर्चा करण्यास चांगली मदत करतील, व साधनांसाठी अधिक लवचिक अशी सदस्य-परवानगी देतील. यासाठीची पूर्व-अट ही आहे कि, सदस्य खाते हे विकिमिडियाच्या सर्व ९०० विकिंवर अनन्य(यूनिक) असावयास हवे.

दुर्दैवाने, काही खाती ही सध्या सर्व विकिंवर अनन्य नाहीत,पण त्याएवजी ती, सारख्या सदस्यनामामुळे,सदस्यनाव तेच असलेल्या इतर सदस्याशी टकरावतात.ही खात्री करण्यास कि,हे सर्व सदस्य विकिमिडिया विकि भविष्यात वापरू शकतील,आम्ही यापैकी बहुसंख्य खात्यांचे पुनर्नामाभिधान(रिनेम)“~” साठी करणार आहोत.त्यांच्या सदस्यनावाचे शेवटी त्यांच्या विकिचे नाव जोडल्या जाईल.याची तारीख अद्याप निश्चित ठरलेली नाही.उदाहरणार्थ, “Example” हे नाव असलेल्या स्वीडिश विक्शनरीचा सदस्य, पुनर्नामाभिधानानंतर,त्याचे “Example~svwiktionary” हे नाव होईल.

सर्व खाती पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील व आतापर्यंत केलेल्या सर्व योगदानांचे श्रेय मिळत राहील.तसे असेल तरी,पुनर्नामाभिधानित खात्याच्या सदस्यांना (ज्यांना आम्ही वैयक्तिकरित्या संपर्क साधु) सनोंद प्रवेश करतांना त्यांचे नविन खात्याचे नाव वापरावे लागेल.

जी खाती वैश्विक आहेत, त्यांना स्थानिकरित्या असंलग्न होण्यापासून वाचविण्यासाठी,स्थानिकरित्या करण्यात येणारे सदस्यांचे पुनर्नामाभिधान हटविण्यात आले आहे. सदस्य विशेष:वैश्विक खाते पुनर्नामाभिधान विनंती हे त्यांच्या स्थानिक विकिवर वापरुन, किंवा येथे मेटावर, जर त्यांना आपले नविन सदस्यनाव आवडले नाही तर, त्यांचे खात्याचे पुढे पुनर्नामाभिधान करणेबाबत सांगणे याचा वापर करु शकतात.